नवीन / विभक्त रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

रेशन कार्ड अर्ज जमा करण्याची प्रक्रिया.

अन्न सुरक्षा समाविष्ट,रेशन कार्ड ऑनलाईन करणे अर्ज जमा करण्याची प्रक्रिया.

  1. 1नमुना १ अर्ज
  2. 2हमीपत्र
  3. 3तलाठ्याचा दाखला घेऊन तहसीलदारांकडून उत्पन्न दाखला
  4. 4कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  5. 5स्वयंघोषणापत्र
  6. 6मतदान कार्ड
  7. 7घराचे लाईट बिल
  8. 8ग्रामपंचायत ८-अ चा मूळ उतारा किंवा भाडेकरारपत्र
  9. 9सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो
  10. 10गॅस पासबुकची छायांकित प्रत
  11. 11विवाह प्रमाणपत्र
  12. 12माहेरच्या रेशन कार्डमधून ऑनलाइन नाव कमी केल्याचा तहसील दाखला

उत्पन्नाबाबत सामान्य माहिती

  • PHH: ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न ₹44,000 पर्यंत आणि शहरी भागासाठी ₹59,000 पर्यंत.
  • NPH/APL White: साधारणपणे ₹1 लाखापर्यंत उत्पन्न. अंतिम पात्रता जमीन, वाहन आणि कुटुंबाच्या परिस्थितीनुसार ठरते.

अंतिम उत्पन्न मर्यादा आणि पात्रता संबंधित तहसील कार्यालयाकडून निश्चित केली जाऊ शकते.

अर्ज जमा करण्याची प्रक्रिया

  1. सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करा.
  2. अर्ज भरून त्याची प्रिंट काढा.
  3. अर्ज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करा.
  4. अर्जाची नोंद झाल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून पुढील कार्यवाही सुनिश्चित करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नवीन रेशन कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

नमुना १ अर्ज, हमीपत्र, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, मतदान कार्ड, लाईट बिल, ८-अ उतारा किंवा भाडेकरारपत्र, फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रे आवश्यक असतात.

विभक्त रेशन कार्डसाठी कोणता दाखला आवश्यक आहे?

माहेरच्या रेशन कार्डमधून ऑनलाइन नाव कमी केल्याचा तहसील दाखला आवश्यक असतो.

रेशन कार्डचा अर्ज कुठे जमा करावा?

अर्ज भरून त्याची प्रिंट तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करावी.